अमरावतीत तीन कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
अमरावती, 
MD drugs seized अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील लालखडी ते सुकळी वनारसी रोडवर रविवारी सायंकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान धडक कारवाई करत 3 कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त केले.
 
 
dra
 
MD drugs seized पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल फहीम अब्दुल (वय 25 वर्ष रा.आझाद नगर), शेख आयान शेख रमजान (वय 20 वर्ष रा. द्वारका नगर) या दोघांना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना एमडीची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर अधिकची माहिती गोळा करून गुन्हे शाखा पथकाने सापळा लावला. उपरोक्त दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची तपासणी केल्यावर त्यांच्याकडे एमडी आढळून आले. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत एमडीची तपासण्यात आले. मोजदाद केल्यावर ते 2 किलो 80 ग्राम होते. त्याची किंमत सुमारे 3 कोटी 1 लाख 20 हजार आहे. पुढील कारवाई सुरू आहे. या कारवाईत प्रमुख पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.