मराठी पत्रकार संघातर्फे गोरेगावात आज ‘मिडीया नवरत्न अवार्ड’

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
गोरेगाव, 
गोंदिया जिल्हा मराठी पत्रकार संघ शाखा गोरेगावच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या मान्यवरांची निवड करून त्यांना 'Media Navratna Award' मिडीया नवरत्न अवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या अनुषंगाने यंदाचा ‘मिडीया नवरत्न अवार्ड २०२५-२६’ सोहळा सोमवार ९ मार्च रोजी स्थानिक शर्माजी गेस्ट हॉऊस येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
 
 
mi
 
 
'Media Navratna Award' सायंकाळी ६ वाजताच्या या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर राहणार आहेत. तर दिप प्रज्वलक म्हणून आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल राहतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून गोरेगावचे नगराध्यक्ष तेजराम बिसेन, माजी आ. हेमंत पटले, जि.प. सभापती डॉ. लक्ष्मण भगत, माजी जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष इंजि. आनंद चंद्रिकापूरे आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या ९ मान्यवरांचा अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ व मोमींटो देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यात दुर्गाप्रसाद ठाकरे यांना उद्योग रत्न, कांताबाई साखरे यांना लोकसेवक रत्न, डॉ. संदीप वाघमारे आरोग्य रत्न, शेतकरी सुरेंद्र बिसेन कृषी रत्न, डिलेश्वर पंधराम पत्रकार रत्न, टोलीराम बघेले महाराज समाज रत्न, श्री. दुर्गामाता मंदिर उत्सव समिती सेवा रत्न, जि.प. वरीष्ठ प्राथमीक शाळा सोनेगाव शिक्षण रत्न व गुन्हेगारी मुक्त गाव म्हणून तालुक्यातील बागळबंध या महसूली गावाला गुन्हेगारी मुक्त गाव रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल. तेव्हा जास्तित जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.