नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयोचे वार्षिक शिबिर, वृक्षपूजन

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
पुसद, 
Naik Engineering Rasyo Camp बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विशेष शिबिर कारला (जुने) येथे २४ फेब‘ुवारी ते २ मार्चदरम्यान पार पडले. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वानखडे, मुख्य अतिथी सहगटविकास अधिकारी संजय राठोड, सरपंच सुभाष धाड, मु‘याध्यापक सोनबा ढोकणे, गणपत मंदाडे, ज्येष्ठ नागरिक कार्यक‘म अधिकारी डॉ. संजय भागवत, प्रा. भावना भावसार, प्रा. अक्षय पुंडे, प्रा. आरती गवळी तसेच रासेयो स्वयंसेवक व गावातील नागरिक उपस्थित होते.
 
 
shibir
 
Naik Engineering Rasyo Camp कार्यक‘माची सुरुवात सरस्वतीमाता व संत गाडगेबाबांचे प्रतिमा पूजन व राष्ट्रीय योजनेच्या प्रार्थनेने करण्यात आली. आढावा प्रा. भावना भावसार यांनी सादर केला. डॉ. संजय भागवत यांनी रासेयोअंतर्गत विविध उपक‘म व शिबिरादरम्यान राबविण्यात आलेल्या उपक‘मांची माहिती देऊन सर्व स्वयंसेवकाचे कौतुक केले. रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी गोपाळ काळे यांनी मनोगत व्यक्त केले.