जनतेच्या समस्या सोडवण्यालाच प्राथमिकता : खा. प्रतिभा धानोरकर

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
वणी आणि मारेगाव तालुका आढावा बैठक

वणी/मारेगाव, 
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक आहे. अडचणी, समस्या आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यावर तत्काळ मार्ग काढणे ही आमची प्राथमिकता असून, नागरिकांच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असा विश्वास खासदार Pratibha Dhanorkar प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला.
 
 
pratibha
 
वणी येथील महसूल भवन आणि मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘तालुका आढावा बैठकीत’ त्या बोलत होत्या. या दोन्ही खा. धानोरकर यांनी विविध शासकीय विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधला.
रस्ते, शिक्षण, पाणी आणि शेतीविषयक प्रश्नांवर चर्चा करताना त्यांनी उपस्थित असलेल्या महसूल, शिक्षण व इतर विभागांच्या अधिकार्‍यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. विकासकामात कोणतीही दिरंगाई न करता सर्वसामान्यांची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या निर्देश यावेळी प्रशासनाला दिल्या.
 
 
Pratibha Dhanorkar  या आढावा बैठकींना वणी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार आणि मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराना, माजी सभापती नरेंद्र ठाकरे, तहसीलदार उत्तम निलावाड, वणी नगर परिषद मु‘याधिकारी सचिन गाडे, काँग‘ेस प्रदेश महासचिव संजय खाडे, वसंत जिनिंग अध्यक्ष प्रमोद जिल्हा महिला काँग‘ेस अध्यक्ष वंदना आवारी, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर, काँग‘ेस तालुकाध्यक्ष वणी विकेश पानघाटे, करुणा कांबळे व इतर अधिकारी, पदाधिकारी आणि ग‘ामस्थ मोठ्या सं‘येने उपस्थित होते.