नवी दिल्ली
ration card rules 2026 केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्डधारकांसाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजनेचा अधिक प्रभावी अंमल करण्यासाठी १ एप्रिल २०२६ पासून रेशन कार्डसंबंधी नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे खऱ्या गरजू कुटुंबांना लाभ मिळण्याची हमी राहणार असून, अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन यादीतून कायमची वगळली जाऊ शकतात.
नवीन नियमांनुसार, रेशन कार्डासाठी पात्रता ठरवताना कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, मालमत्ता, वाहन आणि घरातील सुविधा यांचा विचार केला जाणार आहे. शहरी भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास आणि ग्रामीण भागातील कुटुंबाचे उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास ते अपात्र ठरतील. तसेच, ज्या कुटुंबाची मालकीतील कार, ट्रॅक्टर किंवा इतर चारचाकी वाहन आहे, त्यांना रेशन लाभ मिळणार नाही. मालमत्ता निकषानुसार १०० चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळाचा प्लॉट, फ्लॅट किंवा स्वतःचे पक्के घर असलेल्या लाभार्थ्यांना देखील योजनेतून वगळले जाणार आहे.याशिवाय, कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असल्यास संपूर्ण कुटुंबाचे रेशन कार्ड रद्द केले जाईल. घरात एसी किंवा जनरेटर सारख्या सुखसोयी असल्यासही लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. सरकारने ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक केले असून, रेशन कार्डधारकांनी आपल्या आधार पडताळणी प्रक्रियेतून जाणे आवश्यक आहे. ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड तातडीने रद्द केले जाईल.
प्रशासनाने यावरील ration card rules कडक कारवाईची सूचना दिली आहे. जर तपासादरम्यान कुणी चुकीची माहिती देऊन रेशन लाभ घेतल्याचे आढळले, तर केवळ त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार नाही, तर आतापर्यंत घेतलेल्या धान्याची वसुली बाजारभावानुसार केली जाईल आणि कायदेशीर कारवाई देखील होईल.सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील गरिबी रेषेखालील खऱ्या लाभार्थ्यांना पुरवठा सुरळीत मिळण्यास मदत होणार आहे. विद्यमान आकडेवारीनुसार, या नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे सुमारे ७० लाख अपात्र रेशन कार्ड्स बंद होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे देशातील लाखो लोकांना त्यांच्या हक्काच्या रेशनसाठी पुढाकार घेणे आवश्यक ठरणार आहे, तर अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, या उपाययोजनांमुळे रेशन वितरणात पारदर्शकता वाढेल आणि खऱ्या गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची हमी राहील.