समाधान शिबिराचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
 हिंगणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर
 
सेलू, 
Satisfied Camp छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुयातील हिंगणी येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात प्रत्येक मंडळस्तरावर आयोजित या शिबिरांमध्ये उपस्थित राहून नागरिकांनी महसूलसह विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले. यावेळी हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसिलदार डॉ. शकुंतला पाराजे, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष अशोक मुडे, उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी दिलीप गर्जे, नायब तहसिलदार मधुकर ठाकरे, कलिंगकुमार किरसान व राजेंद्र मंथनवार, तालुका कृषी अधिकारी महल्ले उपस्थित होते.
 
 
shivaji
 
Satisfied Camp  सर्वसामान्यांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे निराकरण तसेच महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी मंडळस्तरावर अभियान राबविण्यात येत आहे. मंडळस्तरावर आयोजित शिबिरास उपस्थित राहून नागरिकांनी योजनांचा लाभ घेतला पाहिजे. विभागांनी देखील जास्तीत जास्त शेतकरी, शेतमजूर यांना लाभ देऊन त्यांच्या प्राप्त तक्रारींचे निराकरण करून शिबीर खर्‍या अर्थाने यशस्वी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी अधिकार्‍यांना दिले. उपविभागीय अधिकारी कारंडे यांनी शिबिरामध्ये देण्यात येणार्‍या योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक तहसिलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी केले. शिबिरामध्ये विविध विभागाच्या सर्व योजना मिळून १५६१ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला तसेच आरोग्य विभागामार्फत तपासणी शिबिराद्वारे १३२ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. महिला बचतगटांचे सक्षमीकरण करण्याकरिता महिला बचतगटांचे स्टॉल देखील लावण्यात आले होते. शिबिरास सर्व मंडळाचे मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसुल कर्मचारी, पोलिस पाटील व तालुयातील इतर १० विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपिस्थत होते.