* चौक टाकणार कात
वर्धा,
Statue of Bajaj शहराचे हृदयस्थान असलेल्या आचार्य विनोबा भावे उड्डाण पूल परिसरातील बजाज चौकातील जमनालाल बजाज यांचा पुर्णाकृती पुतळा शनिवारी रात्री क्रेन, जेसीबीच्या मदतीने उचलण्यात आला. पुतळा सकाळी अनेकांना दिसला नसल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. मात्र, ही कार्यवाही कोणत्याही वादामुळे नसून सौंदर्यकरणाच्या कामाचा भाग असल्याचे सांगण्यात आले.
पुतळ्याचे नूतनीकरण तसेच दिशा बदलण्याचे काम करण्यात येत आहे. चौकाला नवे रूप देण्याचा प्रयत्न होत आहे. पुढील एक महिन्यात पुतळा नव्या तेजात पुन्हा उभा राहील, असे बजाज ग्रुपचे अनुराग बजाज यांनी स्पष्ट केले आहे. जमनालाल बजाज यांच्या आग्रहास्तव १९३४ मध्ये महात्मा गांधी वर्धेत आले. त्यानंतर बापूंनी वर्ध्यातील तत्कालीन शेगाव तर आताचे सेवाग्राम येथे राहून स्वातंत्र चळवळीला दिशा दिल्याने वर्धा हे स्वातंत्र चळवळीचे केंद्र राहिले. जमनालाल बजाज हे एक प्रमुख स्वातंत्र्य सैनिक, उद्योगपती आणि महात्मा गांधी यांचे निकटचे अनुयायी होते. थोर पुरुषाचा पुतळा शहराचे हृयस्थान आहे. मध्यंतरी या चौक परिसराचे शासकीय निधी खर्चून सौंदयीकरणही करण्यात आले. तर आता पुन्हा एकदा चौकाच्या संपूर्ण सौंदर्यकरण करण्यात येणार आहे. पुतळ्याचे नूतनीकरण, परिसराची रचना आणि आकर्षक सजावट यामुळे बजाज चौक अधिक देखणा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.