किती विद्यार्थी घडविले यावर व्हावे शिक्षक मूल्यमापन

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
- आयआयएम परिसंवाद
 
नागपूर, 
उच्च शिक्षण क्षेत्रात Teacher evaluation शिक्षकांचे मूल्यमापन केवळ त्यांनी प्रकाशित संशोधनपत्रांवर नव्हे, तर त्यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांवर व्हायला हवे, असे मत लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी व्यक्तकेले. आयआयएम व भारतीय शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक, २०२५’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अतुल वैद्य म्हणाले की, आज शिक्षकांचे श्रेेष्ठत्त्व किती संशोधनपत्रे प्रकाशित केली यावर मोजले जाते. मात्र, स्वतः संशोधन करणे आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी तयार करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे शिक्षकांनी किती सक्षम विद्यार्थी घडविले यावर त्यांचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
 
 
debete
 
Teacher evaluation  भारतीय व्यवस्थापन संस्था नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी सांगितले की, ‘विकसित भारत’ ही संकल्पना या महत्त्वाचा भाग आहे. भारत २०४७ पूर्वीच विकसित राष्ट्र म्हणून उदयास येणार आहे, याची जाणीव ठेवून शिक्षण व्यवस्थेची तयारी करणे आवश्यक आहे. ‘विश्वाचे कल्याण’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ हा विचार भारताच्या ज्ञानपरंपरेचा अविभाज्य भाग असून तो उच्च शिक्षणाच्या प्रकि‘येत प्रतिबिंबित व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले. पहिल्या सत्रात वक्ते अधिवक्ता अशोक दुसर्‍या सत्रात अध्यक्ष डॉ. विश्वजित पेंडसे, वक्तेडॉ. संजय कवीश्वर, तिसर्‍या सत्रात अध्यक्ष डॉ. भीमराया मेत्री, वक्ते डॉ. अतुल वैद्य होते. भारतीय शिक्षण मंडळाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ. अखिलेश पेशवे, डॉ. मंगेश ठाकरे, डॉ. राजेश सिंगरू यांनी कार्यक‘मासाठी परिश्रम घेतले.