चेन्नई
Thalapathy Vijay दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलपती विजय यांचे वैयक्तिक जीवन सध्या प्रचंड चर्चेत आहे. 27 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर विजयच्या पत्नी संगीता सोरनालिंगम यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी विजयवर एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चर्चांनी जोर धरला होता, आणि अखेर थलपती विजयने सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
विजयने कोणाचंही नाव न घेता सांगितले, “माझ्याभोवती असलेल्या अलिकडच्या समस्यांबद्दल काळजी करू नका. कारण त्यावर तुम्ही तुमचा वेळ घालवण्याइतक्या त्या समस्या महत्त्वाच्या नाहीत. मी स्वत: त्यांची काळजी घेईन. माझ्या समस्यांमुळे तुम्हाला दु:खी किंवा तणावग्रस्त होताना पाहून मला सर्वांत जास्त त्रास होतो.” त्यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये थोडासा दिलासा मिळाला असून, त्यांनी आपल्या चाहत्यांना आश्वस्त केले की त्यांनी परिस्थिती हाताळली आहे.
संगीता सोरनालिंगम Thalapathy Vijay यांनी कोर्टात घटस्फोटाच्या अर्जासह वैवाहिक घरात राहण्याची किंवा पर्यायी निवासी व्यवस्था मिळावी अशी मागणी केली आहे. त्यांनी योग्य आणि कायमस्वरुपी पोटगी देण्याचीही विनंती केली आहे, जेणेकरून घटस्फोट प्रक्रियेदरम्यान घर सोडण्याची वेळ येऊ नये. अर्जात सांगितले आहे की विजयने तिला विभक्त होण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबल्यास वैवाहिक घरात राहण्याची परवानगी मिळणार नाही, असे कथितपणे सांगितले आहे.अर्जासोबतच विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांनीही जोर धरला होता. विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांच्या अफेअरच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर खूप गदारोळ झाला. विशेष म्हणजे, दोघांनी अलीकडे एका लग्नसोहळ्यात एकत्र हजेरी लावली होती आणि ते एकाच गाडीतून आले होते. सोहळ्याच्या वेळी दोघांनी एकाच रंगसंगतीची पोशाख परिधान केली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.या प्रकरणामुळे थलपती विजयच्या वैयक्तिक जीवनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अद्याप कोर्टाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, परंतु विजयने सार्वजनिक कार्यक्रमात दिलेल्या प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांमध्ये काही प्रमाणात समाधान निर्माण करत आहेत.