वर्धा जिल्ह्यात दोन दिवस सुर्याचे चटके

खबरदारी घेण्याचे आवाहन

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Wardha temperature वर्धा जिल्ह्यावर निसर्ग कोपला आहे की काय? अति पाऊस आणि आता अति उन्ह सोसावी लागत आहे. यंदा थंडी आखुडती राहिली. आता पारा ४० अंशावर गेल्याने उन्हाचे चटके झोंबू लागले आहेत.
 

Wardha heat wave warning, Wardha temperature 40 degree celsius, 
वर्धा जिल्ह्यांसाठी पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा (हिट वेव) इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात दोन ते तीन वेळा अतिवृष्टी आणि ऋतुबदलानंतर पडलेली बोचरी थंडीही Wardha temperature  नागरिकांनी अनुभवली. तर फेब्रुवारी महिन्यात अचानक बदल झाला आणि दोन-तीन दिवस ढगाळ वातावरणासह गारवाही अनुभवला. मात्र, ५ तारखेपासून नागरिकांना अचानक उकाड्याचा सामना करावा लागला. ६ आणि ७ मार्चला जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या जवळपास होते. आता तर हवामान खात्याने थेट दोन दिवस वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशाराच दिला आहे.