कंत्राटदाराने फांद्या नव्हे, पूर्ण झाडच तोडले

पालिकेकडून फौजदारी कारवाई

    दिनांक :08-Mar-2026
Total Views |
वर्धा,
Wardha Municipal Council, शहरातील झाडांच्या धोकादायक ठरणार्‍या फांद्या तोडण्याचा कंत्राट वर्धा नगरपालिकेने अनिल खिचरे यांना दिला आहे. पण, या कंत्राटदाराने चक झाडेच तोडल्याने आणि संबंधित विषय पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीत निलेश खोंड यांनी पुढे आणल्यावर अखेर कंत्राटदाराविरुद्ध नपच्या वतीने फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस विभागानेही संबंधित प्रकरणी तक्रारीची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.
 

Wardha Municipal Council, 
स्थानिक वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक शनिवार ७ रोजी दुपारी २ वाजता पार पडली. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, मुख्याधिकारी विजय देशमुख, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांची उपस्थिती होती. याच बैठकीत वर्धा शहरातील बेकायदा वृक्ष तोडीस प्रतिबंध करणे या उद्देशाने चर्चा करण्यात आली. याच बैठकीत निलेश खोंड यांनी शहरातील प्रभाग १५ सानेवाडी येथील व शहरातील काही परिसरातील झालेल्या अवैध वृक्षतोडीचा विषय मांडला. कंत्राटदाराला झाडाच्या धोकादायक केवळ फांद्या तोडण्याचा अधिकार असताना काही ठिकाणी कंत्राटदाराने चक डेरेदार वृक्षच मुळापासून तोडल्याच्या विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर एकमताने दोषी कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचा निर्णय घेत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वृक्ष प्राधिकरण Wardha Municipal Council, समितीच्या बैठकीला नप उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, मुरलीधर बेलखोडे, सुरेश आहुजा, राखी पांडे, प्रियंका खंगार, स्नेहा आकारे, डॉ. सचिन पावडे, श्यामकांत भेंडे, सुभाष पाटणकर, भाग्यश्री बोरकर आदींची उपस्थिती होती.