शक्तीचा बुलेटवरून थरार, महिला बुलेट रॅलीने शहर दणाणले

    दिनांक :09-Mar-2026
Total Views |
नागपूर,
womens bullet rally मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला जागतिक महिला दिनानिमित्त महिला बुलेटवर स्वार होत शहराच्या रस्त्यावर उतरल्या आणि थरारक स्टंट्स, आकर्षक प्रात्यक्षिके व जल्लोषपूर्ण रॅलीमुळे संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. ह्यूमॅनिटी सोशल फाउंडेशन व ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या वतीने आयोजित बुलेट रॅलीत १५० हून अधिक महिला बुलेटस्वार आत्मविश्वासाने बुलेटवर स्वार होत रॅलीत सहभागी झाल्या.
 

bike rally 
 
या उपक्रमाची सुरुवात दुपारी क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून झाली. पारंपरिक नऊवारी साडी, फेटे आणि आकर्षक पोशाखात सजलेल्या महिलांनी बुलेटवरून शहरातील प्रमुख मार्गांवर राऊंड फेरी काढत महिला सक्षमीकरणाचा दमदार संदेश दिला. रॅलीदरम्यान सादर केलेल्या चित्तथरारक स्टंट्स, बाईक राईडिंग आणि कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकांनी उपस्थित नागरिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.womens bullet rally काही महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा देखावा, भवानी माता आणि कालिमाता यांच्या प्रतिमा साकारून सांस्कृतिक आणि जोशपूर्ण वातावरण निर्माण केले. रॅलीला महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लता हाथीबेड, निर्मल परिवाराचे प्रमुख प्रमोद मानमोडे, श्रीमंत माने, वृंदा अनिता पांडव, पूजा मानमोडे आदींची उपस्थिती होती. रॅलीनंतर बुलेट राणींचा कौतुक सोहळा, बक्षीस वितरण समारोपाचा कार्यक्रम झाला.