अनिल कांबळे
नागपूर,
Abhishek Sahu murder case विहिरीतून पाणी काढण्यावरुन झालेल्या वादातून एकाच कुटुंबातील दाेन भावंडांच्या मुलांनी एकमेकांवर हल्ला केला.या वादात घरातील महिलांनीही उडी घेतली. यामध्ये तलवारीच्या हल्ल्यात अभिषेक शाहू या युवकाचा खून झाला. या हत्याकांडात सहभागी चारही आराेपींची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जे. माेडक यांनी निर्दाेष मुक्तता केली आहे. शुभम महेश शाहू (25), दिव्यांशू महेश शाहू(23), रजनी महेश शाहू (50) आणिकरिष्मा महेश शाहू (20) अशी निर्दाेषांची नावे आहेत.

महेश शाहू आणि हरिओम शाहू हे दाेन भावंड जुनी शुक्रवारी भागात एकाच प्रांगणात राहत हाेते. त्या दाेन्ही कुटुंबांमध्ये वैमनस्य हाेते. अंगनात एकत्र विहीर हाेती आणि त्यावर दाेन्ही कुटुंबांचा हक्क हाेता. त्या विहिरीला दाेघांसाठी दाेन झाकणे करण्यात आली हाेती. 26 ऑक्टाेबर 2022 राेजी दुपारी बारा वाजता हरीओम यांचा मुलगा अभिषेक याने माेटार पंप उतरवण्यासाठी महेशच्या बाजूचे झाकण उघडले. त्यामुळे महेशची पत्नी रजनी शाहू हिने त्याला शिवीगाळ केली. यावरून वादविवाद झाला आणि त्यावेळी महेशची मुले शुभम आणि दिव्यांशू आणि हरिओमची मुले अभिषेक व सागर यांच्यात हाणामारी झाली. यामध्ये महेशची पत्नी रजनी आणि मुलगी करिष्मा हिनेही उडी घेतली. त्यामुळे हरिओमची पत्नी सरला हिने शिवीगाळ केली. त्यामुळे शुभम आणि दिव्यांशू यांनी घरातून तलावार आणून अभिषेकवर हल्ला केला. या हल्ल्यात अभिषेकचा मृत्यू झाला.
हत्याकांडात चार आराेपी
अभिषेकच्या हत्याकांडात शुभम, दिव्यांशू, करिष्मा आणि रजनी शाहू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करुन कारागृहातही पाठविण्यात आले. जखमी सागर शाहू आणि आई सरला शाहू यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या साक्षीमुळे प्रकरणाला नवे वळण आले. काेतवाली पाेलिसांनी तपासांत गांभीर्य न दाखवत न्यायालयात आराेपपत्र दाखल केले. जखमी सागर शाहू, सरला शाहू यांचे सह एकंदरीत 13 साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी जखमी साक्षीदारांच्या साक्षीवर विश्वास ठेवून आराेपींना कठाेर शिक्षा करण्यात यावी असा युक्तिवाद सरकार पक्षार्ते करण्यात आला .
एफआयआरमध्ये तावत, आराेपी निर्दाेष
शुभम शाहू आणि अन्य आराेपींकडून अॅड. चंद्रशेखर जलतारे ,अॅड. रमेश रावलानी आणि अतूल रावलानी यांनी बाजू मांडली. अभिषेकला कुणाचे हस्ते व काेणत्या शस्त्राने घाव लागला याबद्दल पुराव्यात आणि एफआयआरमध्ये तावत असल्याचे काेर्टात दाखवून दिले. दाेन्ही महिला आराेपी या वाद साेडविण्यासाठी मध्ये पडल्या हाेत्या. एका समूहाने अभिषेकवर हल्ला केल्याची माहिती साक्षिदारांनी दिली. त्यावेळी त्यांनी नेमके आराेपींची नावे घेतली नव्हती. या सर्व संशयास्पद तपासामुळे हत्याकांडातील चारही आराेपींना न्यायालयाने निर्दाेष मुक्त केले.