शेतकर्‍यांना ५० टके अनुदानावर मिळणार १ हजार नग बियाणे टोकन पेरणी यंत्र

*शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन *हिंगणघाट बाजार समितीचा निर्णय

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट,
hinganghat-market-committee : वाढती मजुरांची टंचाई, वाढलेले मजुरीचे दर व बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसायावर होत असलेला परिणाम, वेळेत पेरणी न केल्यास तसेच मळणी न केल्यास त्याचा उत्पन्नावर होत असलेला परिणाम लक्षात घेता शेती व्यवसायात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. शेतकर्‍यांचे हित व शेती व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने हिंगणघाट बाजार समितीच्या संचालक मंडळाने ३० रोजीच्या सभेमध्ये हिंगणघाट व समुद्रपूर तालुयातील शेतकर्‍यांना ५० टके अनुदानावर १ हजार नग बियाणे टोकन, पेरणी यंत्राचा पुरवठा करण्याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना मजुरांच्या टंचाईवर मात करीत एका व्यतीमार्फत कमी वेळेत, कमी बियाण्यात, अचूक व समांतर पेरणी करणे शय होणार आहे. तसेच त्याचा उत्पन्नावर परिणाम होऊन खर्चात बचत होणार आहे.
 
 
HGT
 
 
 
समितीमार्फत पुरवठा करण्यात येणारे बियाणे टोकन यंत्र हे पडगीलवार कंपनीचे असून त्याची ५ हजार ५०० रुपये आहे. सदर टोकन यंत्रामार्फत कापूस, सोयाबीन, तूर, चणा, गहू, मुंग, तीळ व इतर पिके टोबणे, पेरणी करणे शय आहे. बाजार समितीद्वारा हिंगणघाट व समुद्रपूर तालुयातील निव्वळ शेती हा उत्पन्नाचा स्त्रोत असलेल्या शेतकर्‍यांना ५० टके अनुदानावर म्हणजेच २ हजार ७५० रुपयांमध्ये प्रथम अर्ज करणार्‍यास प्रथम प्राधान्य, या प्रमाणे एकूण १ हजार पात्र शेतकर्‍यांच्या एका कुटुंबाला एक यंत्राचा पुरवठा करण्यात येणार आहे.
 
 
बाजार समितीकडून पुरवठा करण्यात येणारे बियाणे टोकन पेरणी यंत्र मिळण्याकरिता शेतकर्‍यांनी सादर करावयाच्या मागणी अर्जाचे वितरण २ रोजी पासून करण्यात येईल. सदर मागणी अर्ज समितीचे कर्मचारी धर्मेंद्र लाखे व सोनाली लांडगे यांचेशी संपर्क साधून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्राप्त करून घ्यावयाचे आहे. अर्जासोबत चालू वर्षाचा सातबारा, आधार कार्ड, रेशन कार्ड, हिंगणघाट बाजार समितीमध्ये शेतमाल विक्री केल्याची पावती, शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र, तसेच अर्जधारकाचे ज्या बँकेत खाते आहे अश्या बँकेचा २ हजार ७५० रुपयांचा कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटच्या नावाने डीडी किंवा धनादेश, आदी दस्तावेजासह अर्ज भरणा करून समितीचे कापूस मार्केट यार्ड येथील मुख्यालयात धर्मेंद्र लाखे व सोनाली लांडगे यांचेकडे २० एप्रिलपर्यंत कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून सादर करावयाचा असून त्याबाबतची पोच पावती घेणे आवश्यक आहे.
 
 
शेतकरी सक्षमीकरणच्या दृष्टीने विकसित तंत्रज्ञानयुत शेती अवजारे शेतकर्‍यांना उपलब्ध होणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय बाजार समितीने घेतल्याची माहिती सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी दिली. यावेळी उपसभापती हरीश वडतकर, संचालक मंडळ मधुकर डंभारे, मधुसूदन हरणे, ओमप्रकाश डालिया, प्रफुल्ल बाडे, उत्तम भोयर, अशोक उपासे, आदी उपस्थित होते.