मल्याळम दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
हैद्राबाद,
Allegations against Malayalam director मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रंजित बालकृष्णनवर गंभीर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. कोची पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने बुधवारी त्याला १३ एप्रिल २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई एका अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर करण्यात आली असून, एफआयआर नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी रंजितला इडुक्कीमध्ये ताब्यात घेतले आणि चौकशी नंतर एर्नाकुलमच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले.
 
 
 Malayalam director
 
अभिनेत्रीच्या आरोपानुसार, ३० जानेवारी रोजी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लोकेशनवरील व्हॅनिटी व्हॅनमध्ये रंजितने लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. ३१ मार्च रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने प्रकृती अस्वस्थ असल्याची तक्रार केली. आरोग्य तपासणीसाठी त्याला एर्नाकुलम जनरल रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी गंभीर आरोग्य समस्या नसल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली. रंजित बालकृष्णनवर अशा प्रकारच्या गंभीर आरोपांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०२४ मध्ये एका बंगाली अभिनेत्रीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. तसेच २००९ मध्ये एका चित्रपटाच्या चर्चेदरम्यानही रंजितने कथितरित्या अभिनेत्रीशी गैरवर्तन केले असल्याचे सांगितले गेले होते.