हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
मुंबई
Bhooth Bangla अक्षय कुमार यांचा बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी चित्रपट भूत बंगला सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘तू ही दिसदा’ हे गाणे प्रदर्शित झाले होते, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सुरुवातीला ट्रेलर २७ मार्च रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. मात्र नंतर ही तारीख ३० मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली. चित्रपटाचा ट्रेलर ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे
 

Bhooth Bangla 
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले आहे. जवळपास १५ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन ही यशस्वी जोडी पुन्हा एकत्र आली आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. चित्रपटात परेश रावल, तब्बू, वामिका गब्बी, मिथिला पालकर, जिशु यू. सेनगुप्ता, मनोज जोशी आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.