मागील दशकात 2025 मध्ये चंद्रपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक

*सुरेश चोपणे यांची माहिती

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
चंद्रपूर, 
chandrapurs-temperature : विदर्भात मार्च महिन्यात उष्णतेचा पारा 40 अंशावर जातो. मागील 2016 ते 2025 या दशकात मार्च महिन्यात 2025 मध्ये चंद्रपूर विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले. त्या वर्षी चंद्रपूरचे तापमान मार्च महिन्यात सर्वाधिक 44.4 अंश सेल्सिअस होते. मागील दशकात मार्च 2018, 2021, 2022, 2025 या चार वर्षात मार्च महिन्यातील चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक राहिले आहे. तर, यंदाच्या मार्च 2026 मध्ये चंद्रपूर व अकोला शहराच्या तापमानाची नोंद 42.3 अशी सर्वाधिक झाली आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे यांनी दिली.
 
 
K
 
मागील दशकात मार्च 2016 मध्ये चंद्रपूरचे तापमान 43.0, नागपूर 40.9, अकोला 43.1, वर्धा 42.0, यवतमाळ 40.5, गोंदिया 39.6, अमरावती 41.4, बुलढाणा 40.3 होते. तर मार्च 2017 मध्ये चंद्रपूर 43.2, नागपूर 43.3, अकोला 44.1, वर्धा 43.8, यवतामळ 42.5, गोंदिया 42.2, अमरावती 43.0, तर बुलढाणाचे तापमान 41.0 होते. मार्च 2018 मध्ये चंद्रपूर 42.8, नागपूर 41.0, अकोला 42.1, वर्धा 42.0, गोंदिया 40.3, अमरावती 42.2, तर बुलढाणाच्या तापमानाची नोंद 39.6 अंश सेल्सिअस झाली होती.
 
 
 
मार्च 2019 मध्ये चंद्रपूर 43.1, नागपूर 43.3, अकोला 43.6, वर्धा 43.4, यवतमाळ 42.5, गोंदिया 40.4, अमरावती 43.2, तर बुलढाणाचे तापमान 39.2 होते. मार्च 2020 मध्ये चंद्रपूर 39.0, नागपूर 37.6, अकोला 43.3, वर्धा 37.8, यवतमाळ 40.0, गोंदिया 35.8, अमरावती 39.2, बुलाढाणाचा पारा 35.6 होता. मार्च 2021 मध्ये चंद्रपूर, 43.6, नागपूर 41.9, अकोला 42.8, वर्धा 42.2, यवतमाळ 42.4, गोंदिया 42.0, अमरावती 42.2, बुलाढाणाचे तापमान 41.0 राहिले.
 
 
मार्च 2022 मध्ये चंद्रपूर 44.2, नागपूर 42.1, अकोला 43.2, वर्धा 42.8, यवतामाळ 41.9, गोंदिया 41.5, अमरावती 40..0, तर बुलढाणाचे तामान 40.3 होते. मार्च 2023 मध्ये चंद्रपूर 38.8, नागपूर 39.0, अकोला 39.4, वर्धा 40.2, यवतमाळ 38.9, गोंदिया 37.2, अमरावती 39.8, तर बुलढाणा 38.2 होते. मार्च 2024 मध्ये चंद्रपूर 41.6, नागपूर 41.0, अकोला 42.8, वर्धा 42.1, यवतमाळ 41.9, गोंदिया 40.2, अमरावती 41.8, तर बुलढाणाचे तापमान 41.0 होते. मार्च 2025 मध्ये चंद्रपूर 44.4, नागपूर 41.9, अकोला 42.3, वर्धा 41.9, यवतमाळ 41.1, गोंदिया 40.2, अमरावती 41.2, तर बुलढाणा 38.8 होते.
 
मार्च 2026 मध्येही चंद्रपूर, अकोला सर्वाधिक
 
मार्च 2026 मध्ये यंदाही चंद्रपूराच्या तापमानाने उच्चांक गाठला असून, पारा 42.3 वर पोहचला आहे. तसेच अकोला 42.3, नागपूर 41.9, वर्धा 41.9, यवतमाळ 41.2, गोंदिया 40.2, अमरावती 41.4, तर बुलढाणा येथे 38.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.