जालन्यात कॉग्रेसचे सात नगरसेवक निलंबित

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
जालना,
Congress corporators suspended in Jalna जालना शहर महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाने आपल्या सात नगरसेवकांवर कठोर कारवाई केली आहे. पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत या सर्वांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत गटनेते फारूक तूंडीवाले यांचाही समावेश आहे. माहितीनुसार, महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या निवडीवेळी या नगरसेवकांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात जाऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता संबंधित नगरसेवकांनी पक्षाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले.
 
 

Congress corporators suspended in Jalna 
 
यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पक्षाच्या निर्णयाची माहिती देताना प्रदेश उपाध्यक्ष (संघटन व प्रशासन) यांनी सांगितले की, पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे या सातही सदस्यांना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जालना महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.