काैटुंबिक वादातून पतीने आत्महत्या केल्यास पत्नी जबाबदार नाही

- उच्च न्यायालयाचा निर्वाळा : पत्नीवरील गुन्हा रद्द

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
family-dispute : संयुक्त कुटुंबात राहताना प्रत्येक कुटुंबात काैटुंबिक वाद हाेत असतात. लग्नानंतर पती-पत्नीतही किरकाेळ कारणावरुन वाद हाेत असतात. दाेघेही एकमेकांवर आराेप लावून स्वतःला याेग्य असल्याचे दाखवत असतात. अशा वादातून जर पतीने घराबाहेर जाऊन आत्महत्या केली तर पतीच्या आत्महत्येस पत्नीला जबाबदार धरता येणार नाही. असा महत्त्वपूर्ण निवार्ळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. हा निर्णय न्यायमूर्ती उर्मिला जाेशी-ाळके यांनी दिला.
 

K 
अमरावतीत राहणारा युवक आशिष (काल्पनिक नाव) संयुक्त कुटुंबात राहत हाेता. त्याचे प्रगती (काल्पनिक नाव) हिच्याशी कुटुंबियांच्या संमतीने लग्न झाले. कुटुंबात नवीन सून आल्यानंतर प्रत्येक जण तिच्यावर अवलंबून हाेता. घरातील किराणापासून ते भाजीपाला आणण्यापर्यंतची सर्व कामे तिला करावी लागत हाेती. त्यामुळे ती नेहमी चिडचिड करायची. तिचे पतीशी वारंवार वाद व्हायचे आणि तीन माहेरी निघून जात हाेती. कुटुंबातील सदस्य पुन्हा तिची मनधरणी करुन परत आणत हाेते. 26 नाेव्हेंबर 2019 राेजी आशिषचे प्रगतीशी वाद झाला. किरकाेळ कारणावरुन झालेल्या वादाचे स्वरुप वाढले आणि कुटुंबात ताणतणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आशिषने रागाच्या भरात रेल्वेसमाेर उडी घेऊन आत्महत्या केली. राजापेठ पाेलिसांनी या प्रकरणी प्रथम आकस्मिक मृत्यूची नाेंद केली.
 
 
आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आराेप
 
 
प्रगतीने वाद घातल्यामुळेच आशिषने आत्महत्या केली. त्यामुळे प्रगतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आराेप आशिषच्या कुटुंबियांनी प्रगतीवर केला. तसेच तक्रारीनुसार, प्रगती पतीशी सतत वाद घालत हाेती, शिवीगाळ व मारहाण करत हाेती, तसेच क्षुल्लक कारणांवरून माहेरी निघून जात हाेती. पतीला खाेट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसेही मागत हाेती आणि तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आराेपही आशिषच्या कुटुंबियांनी केला.
 
 
उच्च न्यायालयात धाव
 
 
मानसिक त्रास सहन न झाल्याने पती आशिषने आत्महत्या केली, असा आराेप तक्रारीत करण्यात आला हाेता. त्यानुसार राजापेठ पाेलिसांनी पत्नी प्रगतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, पत्नीने स्वतःविरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर व गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती.
 
 
गुन्हे रद्द आणि याचिका निकाली
 
काेणत्याही कुटुंबात पती-पत्नी वाद हाेत असतात. त्यामुळे पती किंवी पत्नीने आत्महत्यासारखे पाऊल उचलू नये. या प्रकरणात पतीने आत्महत्या केली असली तरी त्यासाठी पत्नीला जबाबदार धरता येणार नाही. दाेघांनीही एकमेकांविरुद्ध पाेलिस ठाण्यात तक्रारी दिल्या हाेत्या. पत्नीनेदेखील पतीकडून शारीरिक व मानसिक छळ हाेत असल्याचा आराेप केला हाेता आणि त्याचेही विवाहबाह्य संबंध असल्याचे तक्रारीत नमूद केले हाेते. केवळ आराेप-प्रत्याराेप यांवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध हाेत नाही. आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा ठाेस हेतू आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कृती आवश्यक असते. या प्रकरणात पत्नीने पतीला आत्महत्येस भाग पाडले असे काेणतेही ठाेस पुरावे तपासात आढळून आले नाहीत. त्यामुळे महिलेची याचिका मंजूर करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रद्द केला.