बुलढाणा,
bee-attack : बुलढाणा जिल्ह्यात मधमाशांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असतानाच पळसखेड भट येथे घडलेल्या घटनेने या धोयाची तीव्रता पुन्हा अधोरेखित केली आहे. शेतात काम करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात ६५ वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाला, तर सोबतचा मजूर विहिरीत उडी घेऊन थरारक पद्धतीने बचावल्याची घटना मंगळवारी दि. ३१ मार्च रोजी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम ज्ञानदेव सुरोशे हे सकाळी शेतात काम करत होते. यावेळी अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. शेकडो मधमाशांच्या दंशामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉटरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यासोबत असलेले मजूर सचिन निकाळजे यांनी जीव वाचवण्यासाठी शेजारच्या विहिरीत उडी घेत जवळपास तासभर पाण्यात राहून स्वतःचा बचाव केला. सुरोशे यांच्या पश्चात मोठा परिवार असून त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.बुलढाणा जिल्ह्यात मधमाशांच्या हल्ल्यांच्या घटना समोर येत आहेत. पिंपळगाव लेंडी येथे यात्रेदरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात अनेक भाविक जखमी झाले होते, तर दुसरबीड परिसरात लग्न समारंभातही अशाच प्रकारे हल्ला होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे सतर्कता ठेवणे गरजेचे झाले आहे.