देव, दानव महादेवाचीच उपासना करतात : प्रदीप मिश्रा

भगवान शिव महादेवच भाग्ययविधाता!

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
आर्णी,
Gods and demons worship only Mahadev: Pradeep Mishra सिद्धेश्वरनगरी येथे आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या दुसèया दिवशी, मंगळवार, 31 मार्च रोजी दुपारी एक वाजता शिवमहापुराण कथा मंडपस्थळी शहरातील प्रतिष्ठित पवन पनपालिया, बाळासाहेब मुनगिनवार, गोपाल कोठारी यांच्या कुटुंबियांनी आरती करून कथा वाचनाची सुरवात करण्यात आली. दुसèया पर्वाची महती सांगताना पंडितजी म्हणाले, देवाधिदेव महादेवाचे माहात्म्य अगाध आहे. ते देव-दानवांचे भाग्यविधाते आहे. शिवपुराणाचे न घेणारी व्यक्ती महादेव चरणी नतमस्तक होत असते त्यासाठी कठीण तपश्चर्या केल्यास महादेव वर देतात. ज्यांना वर मिळतो तो सर्वश्रेष्ठ ठरतो. परंतु त्याचा परिणाम चांगला किंवा वाईट होऊ शकतो. देव चांगल्या कार्यासाठी तर दानव वाईट कृ त्यासाठी त्याच्या वापर करतात.
 
 
pradeep-mishra
 
परंतु वाईट कृत्यांचा अंत असतो. महादेव हे तपश्चर्या करणा-याला पावतातच तेव्हा त्यांना प्राप्त करण्यासाठी आपलालाही तपश्चर्या करणे आवश्यक आहे. ती तपश्चर्या जंगलात जाऊन नाही तर आपल्या जवळच्या शिवमंदिरात रोज एक लोटा जल किंवा बेलपत्र वाहून करू शकतो. महादेवाच्या शरणात जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. मानवी जीवनात आई ही सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे. तिच्या गर्भात असतानाच आपल्यावर संस्कारांची बीजे पेरली जात असतात. आजच्या माता मात्र गर्भवती सताना मोबाईलचा वापर करतात. तेव्हा त्या कसे संस्कार देतील, हा प्रश्न उपस्थित करून शिवकालीन वरकरणी व तिच्या प्रगल्भ मुलांची कथा सांगून त्यांनी कपिलेश्वर, आनंदेश्वर शिवलिंगाचा जन्म व त्याचे महत्व सांगितले. कथेसाठी लाखोंच्या संख्येत भक्तांनी हजेरी लावली होती. राष्ट ́ीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख सुनील देशपांडे , यवतमाळ विभाग संघचालक बंडू कोषटवार, यांची विशेष उपस्थिती होती. श्री बहिरमदेव शिवपुराण सेवा समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसह शिवभक्तांनी प्रयत्न केले.