शिरपूर जैन,
huge hindu gathering स्थानिक शिरपूर जैन येथील ओंकार कॉलनी अरिहंत विद्यामंदिर प्राथ. मराठी शाळेजवळ सकल हिंदू समाजाच्या वतीने ४ एप्रिल रोजी सायं ६ ते ८ यावेळी विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
एकता संस्कार शक्ती आणि जातपात कि करो बिदाई, हम हिंदू भाईभाई या संकल्प उक्तीस अनुसरून ह्या विशाल संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या संमेलनाचा मुख्य उद्देश हिंदू संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन जातीपाती भेद विसरून सनातनी हिंदूंचे एकत्रीकरण, स्वदेशी, नागरिक कर्तव्य, पर्यावरण,कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता,सामाजिक एकता आणि धर्मांतराच्या विरोधात जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे. या संमेलनाला प. पू. श्री सिद्धचैतन्य शिवाचार्यजी महाराज (पलसिद्ध धर्मपीठ साखरखेर्डा), प. पू. श्री शांतीपुरी महाराज येवता, प. पू. सिद्धांत सागरजी महाराज, प. पू. पवन महाराज(हिंदू धर्म जनजागृती प्रबोधनकार भेरा), प. पू. परमहंस विजय महाराज, प. पू. गोपाल महाराज (रतनगड), प. पू. सोहमगीर महाराज (जानगीर महाराज संस्थान शिरपूर), डॉ. रवी पाटील, भास्कर वाघ, पुरुषोत्तम दुरतकर (मुख्य संयोजक गायत्री परिवार वाशीम) नारायण महाराज बोबडे, सुधाकरपंत दीक्षित महाराज, मंगेश गावंडे महाराज यांची प्रमुख उपस्थिती सदर कार्यक्रमास राहणार आहे. तसेच प्रमुख वक्ते म्हणून अजय नंदापुरे (वाशीम खंड कार्यवाह) आणि अॅड. श्वेताताई खंडेलवाल ( धर्मजागरण समन्वय वाशीम जिल्हा संयोजिका) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
समस्त शिरपूर शहर उपखंडातील हिंदू बांधवांनी कुटुंबासह मोठया संख्येने ह्या संमेलनास उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.