नागपूर,
International English Olympiad सोमलवार निकालस शाळेतील विद्यार्थ्यांनी Science Olympiad Foundation आयोजित इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड (IEO) २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेचा गौरव वाढविला आहे. विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन आणि गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.इयत्ता चौथीतील धीरा खंते आणि युरा झंझाळ यांनी गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन पटकावले.
गोल्ड मेडल ऑफ एक्सलन्स प्राप्त करणारे विद्यार्थी:इयत्ता दुसरी: समर्थ बाबरिया, अभिनव ठेंगणे, निर्मय केळकर,इयत्ता तिसरी: आदित्य हजारे, आर्या सोमलवार, अनुज गावई,इयत्ता चौथी: मनस्वी माळवी, इशाना पांढरीपांडे, रुद्र माणके, फाल्गुनी रन्नावरे.या यशाबद्दल International English Olympiad सोमलवार अकॅडमीचे सचिवप्रकाश सोमलवार, मुख्याध्यापिका अदिती डोळे, पर्यवेक्षिका अश्विनी ठोसर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना माधवी पांढरीपांडे, निलिमा हर्गुडे आणि पूर्वा माटे यांचे मार्गदर्शन लाभले.
सौजन्य: माधवी पांढरीपांडे, संपर्क मित्र