ॲमेझॉनच्या कार्यालयावर इराणचा हल्ला

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
बहरीन,
Iran attacks Amazon office इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चर्चा सुरू असताना अचानक दोन्ही बाजूंनी तीव्र हल्ले केले जात आहेत. या परिस्थितीत, इराणने बहरीनमधील ॲमेझॉनच्या मुख्यालयावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. हल्ल्यात बहरीनमधील बेटेल्को कंपनीच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. ही इमारत हमाला किंवा भगत येथील मानली जाते. बेटेल्को ही बहरीनमधील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून ॲमेझॉन वेब सर्व्हिसेससाठी काम करते. बहरीन सरकारने फक्त हल्ल्याची पुष्टी केली आहे.
 

Iran attacks Amazon office 
इराणने दिल्या होत्या कंपन्यांवर हल्ल्याच्या धमक्या
उघड झालेल्या माहितीनुसार, इराणने १ एप्रिलपासून गूगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपलसारख्या मोठ्या अमेरिकन कंपन्यांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. इराणच्या लष्कराने म्हटले आहे की, मोठ्या आयटी आणि डिजिटल कंपन्या केवळ सॉफ्टवेअर विकसित करत नाहीत, तर हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणीतही सहभागी आहेत. यामुळे युद्धाचे क्षेत्र केवळ पारंपरिक आणि लष्करी ठिकाणांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर आयटी व डिजिटल पायाभूत सुविधा देखील धोक्यात आहेत.
 
 
इराणच्या लष्कराने कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यालय किंवा कामाची जागा सोडण्याचा सल्ला दिला होता, तसेच निवडक कंपन्या आणि त्यांच्या युनिट्स पूर्णपणे नष्ट करण्याची धमकी देखील दिली.धमकी दिलेल्या १८ कंपन्यांमध्ये डेल, मायक्रोसॉफ्ट, गूगल, ॲपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला, बोईंग, हेवलेट पॅकार्ड, एचपी, सिस्को, ओरॅकल, मेटा, जेपी मॉर्गन, जनरल इलेक्ट्रिक, जी४२, एनव्हिडिया आणि प्लँटर यांचा समावेश आहे. हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली असून, सुरक्षा उपायांची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज भासली आहे.