मंदिरावर झेंडा चढविताना इसमाचा विद्युत धक्याने मृत्यू

*महादेवपुरा येथील घटना

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
electric-shock : गुरुवार २ रोजी होणार्‍या हनुमान जयंतीनिमित्त भाविकांकडून जोरदार तयारी सुरू असताना महादेवपुरा येथील प्राचीन श्री हनुमान मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली. मंदिरावर झेंडा चढवित असताना इसमाचा तोल जाऊन थेट खांबावर पडला. यावेळी त्यांचा विद्युत धयाने मृत्यू झाला. ही घटना बुधवार १ एप्रिल रोजी सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली. अनिल सुरेश परियाल (४५) असे मृतकाचे नाव आहे.
 
 
KL
 
 
 
हनुमान जयंतीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनिल परियाल हे या तयारीत प्रमुख कार्यकर्ते म्हणून सहभागी होते. दरम्यान, बुधवारी दुपारी ते मंदिरावर चढून भगवा झेंडा लावत असताना त्यांचा तोल गेला आणि ते मंदिराशेजारील वीज खांबावर पडले. जीवंत विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिल परियाल यांना करंट लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी लाकडाच्या सहाय्याने अनिल यांना तारांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. माजी नगरसेवक शेख नौशाद, इमरान कैसर, बबलू खान, साजिद माजान, सानू खान, इमरान इम्मू यांच्यासह इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली होती. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यत होत आहे.