जगदंबा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी कळंबच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
jagdamba-institute-of-pharmacy : कळंब येथील जगदंबा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांची नितिका प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये यशस्वी निवड झाली आहे. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये नितिका औषधनिर्मिती व संशोधन क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक ज्ञान, संवादकौशल्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करत निवड मिळवली. नितिका फार्मास्युटिकलच्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये कंपनीच्या प्रतिनिधी पल्लवी बोरकुटे आणि दीप्ती साहू यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.
 
 
y1Apr-Jagdamba
 
या प्लेसमेंट प्रक्रियेत बी. फार्मच्या 99 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे सचिव डॉ. शीतल वातिले आणि संचालक पवन वातिले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
 
संस्थेचे प्राचार्य डॉ. राहुल बिजवार व विभाग प्रमुख प्रा. सुबोेध धोणे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले की, संस्थेत दिल्या जाणाèया दर्जेदार शिक्षणामुळे आणि नियमित प्रशिक्षण उपक्रमांमुळे विद्याथ्यांना अशा संधीमध्ये यश मिळत आहे.
कळंब येथे पार पडलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. आझम खान आणि प्रा. रोसलिन अलेक्झांडर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. श्रीकांत कमले आणि प्रा. रुचिका गवांडे यांचेही सहकार्य विद्यार्थ्यांना लाभले. या सर्वांनी विद्यार्थ्यांना मुलाखत तयारी, संवादकौशल्य आणि तांत्रिक ज्ञान याबाबत योग्य मार्गदर्शन केले. या उपक्रमात अमोत्र कठाळे, निखिल बेलसरे, गौरव जिवतोडे, शुभम दुधाने, महेश पोहिनकर, अजय बावणे आणि गायत्री गाडेकर यांचेही सहकार्य लाभले.