वर्धा,
kharif-cultivation : यंदा रबी हंगामात समाधानकारक उत्पन्न न झाल्याचे शेतकरी सांगत असले तरी आगामी खरीप हंगामात ४.१५ लाख हेटरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या वतीने नियोजन सुरू करण्यात आले असून शेतकरी सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती देत आहे.
सन २०२६-२७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यात ४ लाख १५ हजार ९२९ हेटर क्षेत्रावर विविध पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी विविध पिकांचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. मागीलवर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन उत्पादकांचा तोंडचा घास चारकोलरॉट व यलो मोझॅकने हिरावून घेतला. तर अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला. असे असले तरी मोठे धाडस करून शेतकरी सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती देत आहे.
खरीपाचे पिकानुसार नियोजन
सोयाबीन : १,३१,७९४ हेटर
कापूस : २,२१,८३१ हेटर
तूर : ६०,८६८ हेटर
ज्वारी : ५३७ हेटर
मका : १६४ हेटर
भुईमुंग : २७४ हेटर
मूग : २४१ हेटर
उडीद : १९३ हेटर