बुलढाणा,
citu-movement : देशातील कोट्यावधी कामगारांनी आपल्यावर अन्याय करणार्या ४ श्रम संहिता सरकारने तातडीने रद्द कराव्यात. तसेच गेल्या शंभर वर्षांत कामगारांनी लढून मिळविलेल्या ४४ कामगार हिताच्या कायद्याची सरकारने प्रभावी पणे अमंलबजावणी करावी. यासाठी वेळोवेळी देशव्यापी संप करून रस्त्यावर उतरून देशपातळीवर आंदोलने केलीत. केंद्र सरकारने कामगारांच्या कुठल्याही आंदोलनाकडे लक्ष न देता देशातील कोट्यवधी संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे शोषण करण्याची व त्यांना गुलाम बनविण्याची एक प्रकारची सूटच मालक वर्गाला दिली आहे सरकारने चार श्रमसहिंता मंजूर कराव्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. १ एप्रिल रोजी आंदेालन छेडण्यात आले.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या या कामगार विरोधी चार श्रमसंहितेची १ एप्रिल पासून अमंलबजावणी करण्याचे आदेश देशातील सर्व राज्यांना दिले आहेत.१ एप्रिल हा दिवस कामगारांसाठी काळा दिवस म्हणून देशातील कामगार संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीटूचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात सरकारच्या विविध योजनेत महत्वाची कामं करणार्या अ़ंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स, अर्धवेळ स्त्री परिचारिका, शालेय पोषण आहार कामगार महिलांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निदर्शने केली मगण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.जिल्ह्यातील महिला कामगारांनी काळी फीत लावून सरकारच्या धोरणाचा निषेध केला.या आंदोलनात जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड, प्रतिभा पाटील, शारदा इंगळे,रेखा इंगळे, दिपाली एंडोले,सुरेखा डोंगरे, छाया खंडारे, नर्मदा शिरसाट,सरला अंभोरे,साधना गवई,संगिता लहाने, किरण नरवाडे, अपर्णा किलबिले,सविता खिल्लारे,अनिता ठाकरे , कांता दराडे, सुवर्णा लता सुरडकर इत्यादी सह महिला कामगारांनी काळी फीत लावून सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला.