वासनांध एएसआय राजेश जाधव निलंबित

पोलीस अधीक्षकांची कारवाई;अकोला पोलीस दलात खळबळ

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
अकोला,
asi rajesh jadhav स्थानिक सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन येथे मंगळवारी सायंकाळी लॉकअप मध्ये असलेल्या एका आरोपी महिलेला दहा हजार रुपये देऊ करून तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव म्हणणाऱ्या येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी जाधव याचे निलंबन केले.या कारवाईने अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
 

asi जाधव  
 
 
प्राप्त माहितीनुसार एका प्रकरणात अटकेत असलेल्या महिला आरोपीला चार दिवसांचा पीसीआर देण्यात आला.ही महिला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे लॉकअप मध्ये असताना येथील पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव याने या महिलेला दहा हजार रुपये देऊ करून तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव अशी मागणी केली. ही बाब निरीक्षक अनिल जुमडे यांना समजताच त्यांनी त्या एएसआय याला चांगलेच सुनावले असल्याचा एक व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला आहे. शिवाय संबंधित महिलेच्या जबानी वरून एएसआय जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जाधव याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.asi rajesh jadhav दरम्यान जाधव हा पोलीस ठाण्यातून फरार झाला असून त्याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेने पथक स्थापन करून त्याचा शोध घेत आहे.पोलीस दलाच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना अकोला येथे घडल्याने जनमानसातून या घटनेत विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस कोठडी मधील एका आरोपी महिलेकडे कडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या सिव्हिल लाईन पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांचे पोलीस अधीक्षक यांनी नीलंबन केले आहे.
अनिल जुमळे
पोलीस निरीक्षक