अनिल कांबळे,
नागपूर,
minor-mistake-in-application : कृषी विभागात नाेकरी मिळविण्यासाठी केलेल्या अर्जामध्ये नाॅन-क्रिमिलेअर (एनसीएल) प्रमाणपत्राची अनावधानाने चुकीची तारीख नमूद करण्यात आली. ही ‘किरकाेळ चूक’ असून केवळ या कारणास्तव पात्र उमेदवाराला नाेकरीपासून वंचित ठेवता येणार नाही, असे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) नागपूर खंडपीठाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले.

अर्जदार व्ही. टी. चाैधरी यांनी कृषी विभागातील उपसंचालक (गट-अ आणि ब) या पदासाठी 2022 मध्ये जाहिरातीअंतर्गत अर्ज केला हाेता. त्यांनी पूर्व आणि मुख्य अशा दाेन्ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केल्या हाेत्या. मात्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी 6 फेब्रुवारी 2026 राेजी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. जाहिरातीच्या अटीनुसार, उमेदवारांकडे 2023-24 किंवा 2024-25 या आर्थिक वर्षाचे वैध (एनसीएल) प्रमाणपत्र असणे आवश्यक हाेते. अर्जदाराने प्रत्यक्षात 13 नाेव्हेंबर 2024 राेजीचे वैध प्रमाणपत्र अपलाेड केले हाेते. परंतु, ऑनलाइन प्राेाइलमधून माहिती घेताना अर्जामध्ये चुकून 18 फेब्रुवारी 2021 राेजीच्या जुन्या प्रमाणपत्राचा उल्लेख करण्यात आला हाेता. अर्जात जुन्या तारखेचा उल्लेख असल्याने प्रशासनाने त्यांची नाेकरीसाठी असलेली पात्रता रद्द केली हाेती.
मॅटचा सकारात्मक निर्णय
न्यायमूर्ती विनय जाेशी आणि सदस्य-प्रशासकीय नितीन गद्रे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान निरीक्षणे नाेंदविली. अर्जात चुकीच्या तारखेचा उल्लेख असला तरी उमेदवाराने याेग्य आणि वैध प्रमाणपत्र प्रणालीमध्ये अपलाेड केले हाेते, हे सरकारी वकिलांनीही मान्य केले. अर्जातील अशा प्रकारच्या किरकाेळ चुकांमुळे उमेदवाराचे नुकसान हाेऊ नये. यासंदर्भात मॅटने मद्रास आणि केरळ हायकाेर्टाच्या विविध निकालांचा दाखला दिला. मॅटने सरकारला आदेश दिले की, अर्जदाराचे 13 नाेव्हेंबर 2024 राेजीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे. जर त्यानुसार पात्र ठरत असतील तर त्यांना मुलाखतीसाठी बाेलावून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी. या निकालामुळे तांत्रिक कारणास्तव बाद हाेणाèया अनेक उमेदवारांना माेठा दिलासा मिळाला आहे.