नागपूर गार्डन क्लब तर्फे एडेनियम कार्यशाळा :

बागप्रेमींसाठी सुवर्णसंधी !

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
नागपूर :
Nagpur Garden Club नागपूर गार्डन क्लब तर्फे ०३ व ०४ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते ७. या वेळेत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा विषय एडेनियम (वाळवंटातील गुलाब) हा आहे.
 

nitin 
 
या कार्यशाळेचे मुख्य वक्ते समित आदमने असून त्यांनी यापूर्वी या विषयावर ५० हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. उन्हाळा हा एडेनियमच्या वाढीस व फुलांसाठी अनुकूल काळ असल्याने या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन बागप्रेमींना करण्यात आले आहे.कार्यशाळेत एडेनियमची वाढ, फुलांचे प्रमाण वाढवणे, बुंध्याला आकर्षक आकार देणे तसेच विविध प्रकारचे ग्राफ्टिंग याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.Nagpur Garden Club  या कार्यशाळेसाठी स्पॉट नोंदणी ०३ एप्रिल रोजी संध्याकाळी ०४.३० वाजता नागपूर गार्डन क्लब येथे करण्यात येणार आहे.
सौजन्य:नितीन दाते,संपर्क मित्र