गोंदिया
OBC hostel Gondia येथील ओबीसी वसतिगृहात गेल्या १० दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून विद्यार्थ्यांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तर पाणी टंचाईव्यतिरिक्त या वसतीगृहात अनेक समस्या आवासून उभ्या असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणने आहे. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांना भोजन खर्च व निर्वाह भत्ता देण्यात आला नसताना वसतिगृहात वीज पुरवठा वारंवार खंडीत होणे, OBC hostel Gondia स्वच्छतागृहाचा अभाव आदी अनेक समस्यांचा सामना येथील विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. सदर समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी या विद्यार्थ्यांची आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
OBC hostel Gondia शहराला लागूनच कुडवा येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे इतर मागास वर्ग विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलांचे वसतिगृह असून या वसतिगृहात १२ वी नंतरचे शिक्षण घेणारे ७१ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. नियमानुसार, या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता आणि भोजन खर्च शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कसल्याच प्रकारचा भत्ता किंवा खर्च या विद्यार्थ्यांना दिला जात नसून येथील बोअरवेल पूर्णपणे कोरडी पडल्याने गेल्या १० दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. OBC hostel Gondia प्रशासनाने टँकरची सोय केली असली तरी दिवसातून एकदाच टँकर येत असल्याने टंचाई कायम आहे. त्यातच इमारत मालकाने स्वच्छतागृहात खोदकाम केल्याने स्वच्छतागृह बंद पडले असून सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. कडक उन्हाळा असूनही शासनाकडून कुलरची व्यवस्था नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पैशाने कुलर खरेदी केली आहे. मात्र, विज व पाण्याअभावी हे कुलूरही पडून असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे.
आंदोलनाचा पवित्रा
OBC hostel Gondia शासनाने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तर सुरू केले आहे, मात्र तिथे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसोबतच इतर अनेक सुविधांपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे. जर विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या आणि इतर समस्या तातडीने सोडवल्या गेल्या नाहीत, तर ओबीसी अधिकार मंचच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- खेमेंद्र कटरे, संयोजक, ओबीसी अधिकार मंच
OBC hostel Gondiaओबीसी वसतीगृहातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याकरीता सर्वातोपरी प्रयत्न करण्यात येत असून नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याशी टँकरद्वारे मुबलक पाणी पुरवट्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. घरमालकाशी सुध्दा पाणी पुरवठाबाबत चर्चा सुरु आहे.
- किशोर भोयर
उपायुक्त, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, गोंदिया