मार्च ऐंडींग; वित्तीय वर्षाच्या शेवटच्या दिवशी ५० कोटीचे पेमेंट

सुट्टीच्या दिवशीही जिल्हा परिषदेत रेलचेल

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
गोंदिया
Zilla Parishad Gondiya मार्च ऐंडींगमुळे मंगळवारी ३१ मार्च रोजी अनेक शासकीय कार्यालयातील कामकाज सुरू असल्याचे चित्र दिसून आले असताना येथील जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात मात्र मंगळवारी कमालीची गर्दी पहावयास मिळाली. मार्च ऐडींगदरम्यान, अनेक विभागाचे बिल काढण्याचा शेवटचा दिवस असल्याने रात्रीपर्यंत या कालर्यालयात अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार व नागरिकांची गर्दी दिसून आली. दरम्यान, काल, एकाच दिवशी सुमारे ५० कोटी रुपयांच्या वर बिलाचे ऑनलाईन पेमेंट संबंधित विभागाकडून करण्यात आले असल्याची माहिती आहे.
 
gondiya zp 
Zilla Parishad Gondiya शासनाच्या निकषानुसार विविध शासकीय कामांना ३१ मार्च पूर्वी पूर्ण करून शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीचे पेमेंट संबंधिताना करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्यातील वित्त विभागाशी संबंधित सर्व कार्यालय मंगळवारी सुट्टी असताना सुरू ठेवण्यात आले होते. दरम्यान, येथील जिल्हा परिषदेतील लेखा विभागातर्फे जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण, आरोग्य, पाणी पुरवठा आदी महत्वाच्या विभागांतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांचा मंजूर निधीचे पेमेंट वाटप करण्यात आले. Zilla Parishad Gondiya विशेष म्हणजे, वित्तीय वर्षाचा व कामकाजाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हा परिषदेशी संबंधित अनेक कंत्राटदारांचीही मंगळवारी जिल्हा परिषदेत रेलचेल दिसून आली. दरम्यान, वित्त विभागाकडून सायंकाळी ७ वाजतापर्यंत रोजगार हमी योजनेचे २७ कोटी, लघु सिंचन विभागाचे ४५ लाख, सार्व. बांधकाम विभागाचे १.२५ कोटी, महिला व बाल विकास विभाग २ कोटी, समाज कल्याण ५० लाख, पशु संवर्धन १.५० कोटी, शिक्षण विभाग १.५० कोटी, पाणी पुरवठा विभाग १.२५ कोटी, व आरोग्य विभागाचे १.५० कोटी आदी विभागाचे पेमेंट ऑनलाइन पद्धतीने संबंधितांना वाटप करण्यात आले.