बंगळूरू.
physical relations with friends बंगळूरूमध्ये एका अनोख्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. येथे ३७ वर्षीय पतीने आपल्या ३१ वर्षीय पत्नीविरुद्ध पोलिसांत गंभीर तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने आरोप केला आहे की पत्नीने त्याला तिच्या एका मैत्रिणीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सतत भाग पाडले आणि अश्लील व्हिडीओ पाठवून त्याला अशी कृत्ये करायला लावले. पतीने सांगितले की, पत्नीने वैयक्तिक आयुष्यातील खाजगी गोष्टी मित्रमैत्रिणींशी शेअर करून मानसिक त्रास दिला.तक्रारीत पतीने म्हटले आहे की पत्नी मद्यपान करते आणि वारंवार मैत्रिणींसोबत वेळ घालवते. त्याच्या म्हणण्यानुसार, ती आलिशान जीवनशैली राखण्यासाठी पुरेसे पैसे कमावत नसल्याचा तोवर वारंवार त्याला तडजोड करत होती. या वादावर तोडगा काढण्यासाठी ४ जुलै २०२४ रोजी कुटुंबाने मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण पत्नीच्या वर्तनात कोणताही बदल झाला नाही.
याशिवाय, पतीने आपल्या तक्रारीत सासरच्या मंडळींवरही आरोप केले आहेत. त्यांचा दावा आहे की, सासरच्यांनी वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप करून खोटे आरोप मांडले आणि त्याला स्वतःच्या घरातून बाहेर काढले. त्याचे सामान, पासपोर्ट आणि शैक्षणिक कागदपत्रेही दिली नाहीत. तसेच, पत्नीला दिलेले रोख पैसे आणि सोन्याचे दागिने परत देण्यासही नकार दिला. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीनेही तामिळनाडूमध्ये आपल्या पतीवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या दोन्ही बाजूंच्या आरोपांमुळे गुंतागुंतीचे झाले असून, पोलिस तपास सुरू आहेत.