मुंबई
Raja Shivaji मराठी चित्रपटसृष्टीत राजा शिवाजी या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाने सामाजिक माध्यमांवर धुमाकूळ घातला आहे. रितेश देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. पोस्टरनंतर आता समोर आलेल्या टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे
. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत, तर जेनेलिया देशमुख छत्रपती शिवरायांच्या पत्नीची भूमिका साकारत आहेत. याशिवाय संजय दत्त आदिलशाहच्या भूमिकेत झळकणार असून विद्या बालन बेगमची भूमिका साकारणार आहेत. महेश मांजरेकर शहाजीराजे यांच्या भूमिकेत, विशेष म्हणजे, अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत. टीझरची सुरुवात “नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता” या दमदार संवादाने होते आणि त्यात आदिलशाहचा प्रभावी अवतार प्रेक्षकांसमोर येतो. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे