जिल्ह्यात स्वच्छतेचा सन्मान, पळसगावची बाजी

ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्कार

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
सेलू, १ एप्रिल
respect-for-cleanliness-palasgaon : स्वच्छतेचा जागर करणार्‍या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात संत सखुआईची भूमी असलेल्या सेलू तालुयातील पळसगाव ग्राम पंचायतने बाजी मारली आहे. संताची भूमी असलेल्या या गावात सदोदित भतीचा जागर त्याचबरोबर स्वच्छतेचा घेतलेला ध्यास, गावाच्या विकासासाठी झटणार्‍या गावाने ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्याच्या पुरस्कारात प्रथम पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
 
 
JKL
 
 
 
सन २०२५-२६ जिल्हास्तरीय पुरस्कारात सेलू तालुयातील पळसागाव बाई या ग्राम पंचायतने २०० पैकी १९९ गुण मिळवून प्रथम, हिंगणघाट तालुयातील पिंपळगाव ग्राम पंचायतने १९५ गुण घेत दुसरा, देवळी तालुयातील डिगडोह ग्राम पंचायतने १८५ गुण मिळवून तिसरा, तर कारंजा तालुयातील भालेवाडी ग्राम पंचायतने चतुर्थ पुरस्कार मिळविला आहे.
 
 
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविल्या जाणार्‍या या प्रतिष्ठेच्या अभियानात जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतने आपला सहभाग नोंदविला होता. पळसगाव बाई स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर असून या ग्राम पंचायतवर प्रशासक राज असले तरी ग्राम पंचायतचे माजी पदाधिकारी, गावातील नागरिक यांचा असलेला स्वच्छतेचा ध्यास पाहता या गावाची झालेल्या निवडीबद्दल तेथील ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.
 
 
ग्राम पंचायत अधिकारी धीरज शिरभाते, प्रशासक, माजी सरपंच धीरज लेंडे, गट विकास अधिकारी देवानंद पाणबुडे, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांनी या अभियानात विशेष लक्ष दिले, हे विशेष.
 
 
अभियान आहे म्हणून गावात स्वच्छता ठेवावी हा उद्देश नसून सेलू तालुयात असंख्य भाविकांची वर्दळ या गावात असते. भजन, पूजन याच बरोबर स्वच्छतेचा ध्यास याचे फलित झाल्याचे बोलल्या जात आहे.