रोबोटिक सर्जरीची ‘सेंच्यूरी’

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचा प्रगत रोबोटिक सर्जरी कार्यक्रम

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
वर्धा,
robotic surgery आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रगत रोबोटिक सर्जरी कार्यक्रमाने १०० यशस्वी रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांना कमी आघाताच्या उपचारांची सुविधा देण्याबाबत रुग्णालयाची बांधिलकी अधोरेखित झाली आहे.
 

robotic surgery India milestone, 100 robotic surgeries achievement, Acharya Vinoba Bhave Rural Hospital Wardha 
रुग्णालयातील रोबोटिक सर्जरी टीमच्या कौशल्य, अनुभव आणि समर्पणामुळे विविध वैद्यकीय शाखांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढत आहे. सर्जनांच्या संयुत प्रयत्नांमुळे १०० शस्त्रक्रियांचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. या सर्व सर्जनांनी मिळून १०० रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या असून, शस्त्रक्रियेतील अचूकता वाढवणे, रुग्णांच्या पुनर्वसनाचा कालावधी कमी करणे आणि उपचारांचे परिणाम अधिक चांगले करणे यामध्ये रोबोटिक तंत्रज्ञानाची भूमिका वाढली आहे.
रोबोटिक-सहाय्यित शस्त्रक्रियेमुळे robotic surgery जटिल शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने, स्पष्ट दृश्यासह आणि कमी आघाताने करता येतात. यामुळे रुग्णांना लहान चीरे कमी रतस्त्राव, रुग्णालयात कमी दिवस राहण्याची गरज, जलद बरे होण्याच्या प्रक्रियेमुळे रुग्णांना फायदा मिळतो. हा टप्पा केवळ सर्जनांच्या कौशल्याचे प्रतीक नसून अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान स्वीकारून रुग्णांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा रुग्णालयाचा मानस असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. सततचे प्रशिक्षण कार्यक्रम, विविध विभागांतील समन्वय आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी, जनरल सर्जरी, स्त्रीरोग विभाग आणि युरोलॉजी या विभागांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचा वाढता वापर यामुळे रुग्णालयाचा रोबोटिक सर्जरी कार्यक्रम आणखी बळकट करण्याचा मानस व्यत केला जात आहे.आगामी काळात अशा अनेक यशस्वी टप्प्यांची नोंद होण्याचा विश्वास व्यत करण्यात आला आहे. सदर १०० रोबोटिक सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी डॉ. चंद्रशेखर महाकळकर, डॉ. आर. के. शिंदे, डॉ. जय धर्मशी, डॉ. अभिजीत ढाले, डॉ. मंजुषा अग्रवाल, डॉ. नीमा आचार्य, डॉ. भूषण जाजू यांचा सिंहाचा वाट आहे. रुग्णालयाचे प्रशासन रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्यामुळे प्रशासनासह रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांच्या मेहनत व समर्पणामुळे हे रुग्णालय मध्य भारतात शस्त्रक्रियेसाठी एक उत्तम केंद्र बनले आहे.