सचिन तेंडुलकर यांची एकारा विश्रामगृहात विश्रांती

वन्यजीवांविषयी घेतली माहिती

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
सिंदेवाही
Sachin Tendulkar  क्रिकेटपटू,भारतरत्न सचिन तेंडुलकर हे तालुक्यातील कच्चेपार येथे परिवारासह भेट देऊन गेले. यादरम्यान त्यांचे ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा येथील वनविश्रामगृहात आगमन झाले. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
नुकतीच सुरू झालेली कच्चेपार जंगल सफारी ही ब्रम्हपुरी वनविभागातील महत्त्वाची सफारी मानली जाते. त्याची माहिती मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकर यांनी विशेष रस दाखवत कुटुंबासह जंगलभ्रमण करण्याचा निर्णय घेतला.
  
sachin
Sachin Tendulkar सफारीदरम्यान त्यांनी जंगलातील जैववैविध्य, व्याघ्रसंपदा, पर्यावरण संतुलन याबाबत बारकाईने निरीक्षण केले. सफारीनंतर अवघ्या 10 किलोमिटर अंतरावर असलेल्या एकारा वनविश्रामगृहात ते काही काळ विश्रांतीसाठी गेले. येथे असलेले घनदाट जंगल, शांत नैसर्गिक वातावरण, आल्हाददायक हवा हे सर्व पाहून तेंडुलकर भारावून गेले. विश्रामगृहात त्यांनी वन्यजीव संवर्धन, मानव-वन्यजीव संघर्ष आणि जंगल व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली.
Sachin Tendulkar याप्रसंगी उपवनसंरक्षक डॉ. कुमार स्वामी, सहायक उपवनसंरक्षक अरविंद जे., वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश सोनडवले, जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा यांच्यासह वनपाल, वनरक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या सुरक्षेसाठी आणि व्यवस्थित सफारी अनुभवासाठी विभागाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. तेंडुलकर यांनी वनविभागाच्या कार्याचे कौतुक करीत जंगल संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज व्यक्त केली. Sachin Tendulkar कच्चेपार जंगल सफारीला सचिन तेंडुलकर यांसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यक्तिमत्त्वाची भेट मिळणे ही संपूर्ण विभागासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या भेटीमुळे कच्चेपार सफारी आणि ब्रम्हपुरीचा नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणून बुलंद होणारा दर्जा आणखी मजबूत झाला आहे.