रामदासपेठ मारुती मंदिरात संगीता गलांडे यांचे सुश्राव्य कीर्तन

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Ramdaspeth Maruti Temple रामदासपेठ मारुती मंदिरात संगीता गलांडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरु आहे. पहिल्या दिवशी त्यांनी “सद्गुरूवाचुनी सापडेना सोय” हा अभंग सादर केला. अक्कलकोट महाराजांचे शिष्य बाळप्पा यांचे आख्यान त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने सांगितले. जीवनात सद्गुरू आवश्यक असल्याचे, त्यांच्याशिवाय तारणोपाय नसतो हे प्रतिपादन करत त्यांनी अध्यात्माची महत्ता सांगितली.

Ramdaspeth Maruti Temple
संगीता यांनी नामाची श्रेष्ठताही स्पष्ट केली. माणसाला कितीही दुःख आले तरी त्याचा सामना करण्याची ताकद नामात असल्याचे त्यांनी कीर्तनात भावपूर्ण रीतीने सांगितले. दुसऱ्या दिवशी संगीता यांनी वेणास्वामींचे आख्यान सादर केले. पल्लवी मोहरील यांनी कीर्तनकार संगीताताईंना पुष्पहार घालून स्वागत केले. Ramdaspeth Maruti Temple त्यांनी महिपती महाराजांचा “गुरुमाय मला नको चालवू गे” हा अभंग घेतला आणि भाष्य करताना भक्ताने सद्गुरूकडे जाताना काम, क्रोध, मोह, लोभ, मत्सर यांसारख्या विकारांपासून मन दूर ठेवण्याची गरज सांगितली.
वेणास्वामी यांचा लहानपणीचा वैधव्य आणि समर्थ रामदासांच्या सान्निध्यात आलेला अनुभव सांगत त्यांनी आपल्या जीवनाचा मोठा भाग भजन-कीर्तनात व्यतीत केला असल्याचे अधोरेखित केले. त्या पहिल्या महिला कीर्तनकार म्हणून ओळखल्या जातात, आणि जीवनातील संघर्षातून समर्थांच्या चरणी आपले देह अर्पण केले, असे त्यांनी स्पष्ट केले. कीर्तनाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. Ramdaspeth Maruti Temple संगीता यांच्या कीर्तनाचा शेवट कार्यक्रम उद्या पुष्पगुंफणीत होईल. तसेच गुरुवारी सकाळी पाच वाजता हनुमान जन्माचं कीर्तन ह.भ.प. प्रचिती धोंड करतील. देवस्थानाचे सचिव श्रीकांत पळशीकर यांनी भाविकांना तन, मन, धनाने उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य: आशिष नाईक, संपर्क मित्र