पुन्हा बाजार भरला रस्त्यावर

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
सेलू,
Selu weekly market, येथील मंगळवारी भरणारा आठवडी बाजार पुन्हा एकदा रस्त्यावर भरल्याने नगर पंचायतने गत काही दिवसांपूर्वी केलेली कारवाई औटघटकेची ठरल्याचे दिसून येत आहे.
 

Selu weekly market, 
सेलू येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो. आठवडी बाजारासाठी प्रशस्त अशी जागा असताना बाजारात दुकान लावण्याचे व व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दुकानदार रहदारीच्या रस्त्यावर दुकाने थाटतात. यामुळे रस्त्यावरच ग्राहकांची गर्दी अन् रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग अपघाताचे कारण ठरत होते. याबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर नगर पंचायतने काही दिवस रस्त्यावर बाजाराची दुकाने लावण्यास मनाई केली होती. बाजारात मुख्याधिकारी व कर्मचारी तळ ठोकून राहत होते. त्यामुळे तीन आठवडे रस्त्यावर बाजारच भरला नाही. पण, पुन्हा ३१ मार्च रोजी रस्त्यावर आठवडी बाजार भरल्याने नगर पंचायतची ती कारवाई औट घटकेची ठरल्याचे बोलल्या जात आहे. नुकताच या बाजाराचा ठेका नव्याने देण्यात आला. तेव्हा ठेकेदाराला याची माहिती देणे गरजेचे आहे. रस्त्यावर आठवडी बाजार Selu weekly market भरल्यास ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नगर पंचायतने सेलू येथील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढले, पण पुन्हा जैसे तीच परिस्थिती निर्माण झाल्याने नगर पंचायत आपला वचक का ठेऊ शकत नाही, हे एक कोडेच आहे. पण, आठवडी बाजार पुन्हा एकदा रस्त्यावर भरल्याने नगर पंचायतची कारवाई नावापुरती होती का, हा संशोधनाचा विषय बनला आहे.