अमरावती,
sex-trafficking : सातुर्ण्यातील भव्यदिप अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये चालणार्या देहव्यापारावर अमरावती शहर गुन्हे शाखेची पथकाने आज दुपारी धाड टाकली. येथे देहव्यापार करणार्या एका प्रमुख महिलेसह २ युवक व २ युवतींना ताब्यात घेण्यात आले. शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांना गोपनिय माहिती मिळाली होती की, राजापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील सातुर्णा परिसरातील भव्यदिप अपार्टमेंट येथील फ्लॅट क्रंमाक २०२ मध्ये एक महिला लोकांना बोलावून देहव्यापार करीत आहे.

त्या आधारावर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. सत्यता आढळताच पोलिस पथक व पंचासह छापा मारून देहव्यापार करणार्या प्रमुख महिलेसह २ युवक व २ युवतींना ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणी देहव्यापार करणार्या महिला आरोपीकडून माहिती घेतली असता मागील ३ महीन्यापांसून सदर फ्लॅटमध्ये देहव्यापार होत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले आहे. सदर महिलाच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करून त्यांना मदत करणारे व त्यांचेकडे ग्राहक म्हणून जाणार्या इसमांची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येणार आहे. महीलेकडून नगदी ९,१५० रूपये, ५ मोबाईल ६५ हजार असा एकूण ७४,१५० रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरात कुंटणखाना किंवा वेश्याव्यवसाय कुठे चालू असल्यास पोलिसांना तात्काळ माहीती दयावी. माहीती देणार्यांचे नाव गोपिनय ठेवण्यात येईल. ही कारवाई पोउपनि गजानन सोनुने, पोलिस अंमलदार सुनील लासुरकर, दिपक सुंदरकर, मनोज ठोसर, जहीर शेख, सचिन बहाळे, अतुल संभे, योगेश पवार, राजीक रायलीवाले, सुरज चव्हाण, चालक संदीप खंडारे, चेतन शर्मा, राहुल दुधे, महिला अंमलदार वर्षा घोंगळे यांनी केली आहे.