सीताबर्डीत मध्यरात्रीनंर चाेरांचा हैदाेस

- एकाच रात्री ताेडले 5 दुकानांचे कुलूप

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
sitabardi thieves शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी परिसरात मध्यरात्रीनंतर चाेरांच्या टाेळीने हैदाेस घातला. एकानंतर एक पाच दुकानांचे कुलूप ताेडून राेकड आणि माल चाेरून नेला. विशेष म्हणजे या टाेळीत एका महिलेचाही समावेश असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
 

सीताबर्डीत मध्यरात्रीनंर चाेरांचा हैदाेस 
 
सीताबर्डीच्या गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत रात्रीही वदर्ळ असते, मात्र चाेरट्यांनी मध्यरात्रीनंतरची शांततेची वेळ साधली. एकामागून एक पाच दुकानांना लक्ष्य केले. सर्वप्रथम ‘एआर मेन्स’ या रेडिमेड कपड्यांच्या दुकानात घुसून सुमारे 10 हजार रुपयांची राेकड चाेरली आणि तेथील कपडे बदलून पुढे गेले. त्यानंतर ‘आशीर्वाद कलेक्शन’मध्ये शिरून 45 हजार रुपये राेख आणि कृत्रिम दागिने लंपास केले. पुढे ‘ड्रेस 18 युनिफॉर्म’ दुकानातून 55 हजार रुपयांची चाेरी करण्यात आली. चाेरट्यांचे पुढील लक्ष्य ‘स्काय शूज’ दुकान हाेते, जिथून त्यांनी राेकडसह महागडे बूट घालून पलायन केले. शेवटी ‘माया माेबाइल शाॅपी’मधून सुमारे 80 हजार रुपयांची राेकड चाेरून ते पसार झाले. विशेष बाब म्हणजे आराेपींनी माेबाईल किंवा इतर इलेक्ट्राॅनिक वस्तूंना हात सुद्धा लावला नाही, जेणेकरून ट्रॅकिंग टाळता येईल. संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यात एक महिला आपल्या दाेन साथीदारांसह निर्भयपणे चाेरी करताना दिसत आहे.sitabardi thieves घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांनी पाेलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ज्या ठिकाणी चाेरी झाली, त्या भागात रस्त्यावरील दिवे बंद असल्याचेही समाेर आले असून त्याचा फायदा चाेरट्यांनी घेतल्याची चर्चा आहे. सध्या पाेलिस सीसीटीव्हीफुजच्या आधारे तपास करीत आहेत.