५० टक्के सवलतीला थकबाकीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

*कर वसुलीत पुलगाव पालिकेला यश

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
पुलगाव, 
pulgaon-municipality : येथील नगरपालिकेने २५ ते ३१ मार्च या सहा दिवसांत उशिरापर्यंत चाललेल्या मालमत्ता कर थकीत रकमेच्या वसुली अभियानात शहरवासीयांच्या उत्स्फूर्त योगदानामुळे मोठ्या प्रमाणात वसुली शय झाली. जनतेने दिलेल्या सकारात्मक योगदानाबद्दल नगरपालिका उपाध्यक्ष दीपक आहूजा यांनी कृतज्ञता व्यत केली आहे.
 

K 
 
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी मालमत्ता कर थकीत रकमेवर राज्यभरातील सर्व नगरपालिकांद्वारे आकारलेल्या व्याज रकमेवर ५० टके सवलत जाहीर केली होती. पुलगाव नप अध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे याची मागणी करणारा प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकार्‍यांनी हा प्रस्ताव मान्य करून थकीत मालमत्ता करावरील व्याज रकमेवर ३१ मार्चपर्यंत ५० टके सवलत देण्याबाबत पालिका प्रशासनाला पत्र दिले होते.
 
 
२५ मार्च रोजी पुलगाव नगरपालिकेने जाहीर घोषणा करून थकीत रकमेवरील सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. थकीत मालमत्ता कराची रकम ३१ मार्चपूर्वी नगरपालिकेत जमा केल्यास थकीत रकमेवरील व्याजातील ५० टके व्याज रकम माफ केली जाईल, असे सांगितले होते. या घोषणेनंतर २५ ते ३१ मार्च या कालावधीत सुटीच्या दिवशीही नगरपालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचारी आणि उपाध्यक्ष दीपक आहूजा, दिलीप वलीवकर, रवी केशरवानी हे उशिरापर्यंत स्वतः उपस्थित राहून वसुली रकम जमा करण्यात योगदान देत होते.