गाझियाबाद,
Teacher murdered in Ghaziabad गाझियाबादमधील लोणी भागातील गीतांजली विहार येथे राहणाऱ्या नितीन कुमार जयंत नावाच्या तरुणाचा खून झाला आहे. नितीन हे बागपत आणि आसपासच्या खाजगी शाळा व महाविद्यालयांमध्ये रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. नितीनची ओळख मुस्कान नावाच्या मुस्लिम मुलीशी झाली आणि दोघांनी २०२५ मध्ये हिंदू रितीरिवाजानुसार मंदिरात लग्न केले. मुस्कानचे कुटुंब हे लग्न मान्य करीत नव्हते आणि नितीनला धमक्या देत होते. मुस्कान गर्भवती होती आणि लवकरच आई होणार होती.
घटनेच्या दिवशी मुस्कान घरातून निघून गेली आणि तिच्या वडिलांनी व काकांनी नितीन व त्याच्या भावाला बोलावून तडजोड करण्याचे नाटक केले. मुस्कानचे वडील आणि काका नितीनचा गळा दाबून खून करत पळून गेले. दरम्यान नितीनच्या कुटुंबीयांनी मृतदेहासह महामार्ग अडवून योगी सरकारकडे आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सध्या, मुस्कानचे वडील व काका यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले असून, नितीनच्या कुटुंबीयांनी आरोपींसह कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.