अखेर थलपथी विजयचा ‘जन नायगन’ प्रदर्शित होणार?

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
चेन्नई
Jana Nayakan
थलपथी विजय याच्या बहुचर्चित 'जन नायगन' हा चित्रपट सेन्सॉरशिपच्या अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आला होता. यातील काही दृश्ये आणि संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपट पुन्हा परीक्षणासाठी पाठवण्यात आला होता. मात्र आता या अडचणी दूर झाल्या आहे.

Thalapathy Vijay Jana Nayakan release date, 
 एप्रिल महिन्याच्या अखेरीस चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट झळकण्याची शक्यता आहे निर्माते सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २४ एप्रिल किंवा ३० एप्रिल या तारखांचा विचार करत आहेत. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी या बातमीमुळे विजयच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोद यांनी केले असून, यात पूजा हेगडे, बॉबी देओल, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण आणि मामिता बैजू यांसारखी दमदार स्टारकास्ट आहे. चित्रपटाचे संगीत अनिरुद्ध रविचंद्रन यांनी दिले आहे.