अनिल कांबळे
नागपूर,
nagpur accidents गेल्या चाेवीस तासांत रस्ते अपघातात दाेन जण ठार झाले. या प्रकरणी आराेपी चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या घटनेत, कामावरून घरी परत येत असताना हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील शुअरटेक रुग्णालयासमाेरील पुलावर अज्ञात वाहन चालकाने दिलेल्या जाेरदात धडकेत माेटरसायकलस्वार गंगाधर राजेराम दुधकवर (45, रा. धुटी, पाेस्ट. डाेंगरगाव) यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला.
गंगाधर हे साेमवारी आपल्या हाेन्डा शाईन दुचाकीने खापरी येथून काम आटाेपून घरी जात हाेते. वर्धा मार्गावरच्या शुअरटेक रुग्णालयासमाेरील पुलावर पाठीमागून त्यांना धडक देत दुसऱ्या वाहनचालकाने पळ काढला. जखमी गंगाधर यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात भरती केले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. याप्रकरणी फिर्यादी विकेश दुधकवर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पाेलिसांनी ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या घटनेत, विशाल घनश्याम राऊत(वय 19) आणि त्याचा मित्र दीपक बळीराम कटरे(वय 24 ) दाेन्ही रा. त्रिलाेकनगर, दत्तवाडी हे साेमवारी मध्यारात्रीच्या सुमारास दुचाकीने जात हाेते. गिट्टीखदान हद्दीत, गाेरवाडा रिंगराेड, दाभा चाैक येथून जात असता, राेड क्राॅस करणाèया ट्रकचालकाने निष्काळजीपणे व धाेकादायकरित्या चालवून माेटरसायकलला समाेरून धडक दिली. या अपघातात दीपक आणि विशाल हे दाेघेही गंभीर जखमी झाले. दाेघांनाही मेडीकल हाॅस्पीटलमध्ये नेले असता, डाॅक्टरांनी दीपक कटरे यास तपासून मृत घाेषित केले. जखमी विशालचा उपचार सूरू आहे. आराेपी ट्रकचालक आराेपीविरूध्द गुन्हा दाखल केला.
....