वाशीम,
jal yoddha samman ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याचप्रमाणे शिक्षण हे सुद्धा मानवाची मूलभूत आणि महत्त्वाची गरज आहे कारण शिक्षणामधूनच भावी सृजनशील समाजाची निर्मिती होते, असे मत श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे पदवी वितरण समारंभ कार्यक्रमांमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ चे सिनेट सदस्य प्रा. रवींद्र मुंद्रे यांनी व्यक्त केले.
स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत ३० मार्च रोजी पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष जाधव उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिनेट सदस्य डॉ. रवींद्र मुंद्रे, शाळा संचालक अजिंय जाधव, प्रा. संतोष इंगोले, प्रा. दत्तात्रय ढवारे हे उपस्थित होते. यावेळी बीए, बीएससी, एमए, एमएससी च्या ३३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या.
पुढे बोलतांना प्रा. रवींद्र मुंद्रे म्हणाले की, विद्यार्थी हा समाजाचा देशाचा अत्यंत महत्त्वाचा क्रियाशील घटक आहे, त्यामुळे शिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक व देशाच्या जबाबदारीची भावना सतत मनामध्ये तेवत ठेवली पाहिजे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जीवनाचा सर्वांगीण विकास असून, या माध्यमातून मानवाने आपले जीवन परिपूर्ण करावे त्याचबरोबर शिक्षणामधून बुद्धीप्रमाणेवाद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शाखाप्रमुख प्रा.डॉ. संतोष इंगोले यांनी केले त्यामधून या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश कथन केला. प्राचार्य डॉ. सुभाष जाधव यांनी विद्यार्थ्यांनी सतत ज्ञानार्जन केले पाहिजे कारण माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि त्याच्या मनामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा सतत असली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार विज्ञान शाखाप्रमुख प्रा. दत्तात्रय ढवारे यांनी मानले.jal yoddha samman संचालन प्रा. पद्मानंद तायडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. संतोष धामणे, प्रा. विजय जाधव, प्रा. रिंकू रुके, प्रा. भारती राणे, प्रा. साक्षी काबरा, प्रा. मयुरी कुटे, प्रा. खान, प्रा. लहाने, प्रा. बोरकर, प्रा. सुरोशे, प्रा. बोनडे, प्रा. मोरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.