रील स्टारच्या घरातून शस्त्रसाठा जप्त

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
डोंबिवली,
Weapons seized from reel star's house डोंबिवलीत वादग्रस्त चित्रफितीमुळे चर्चेत आलेला सुरेंद्र पांडुरंग पाटील उर्फ चौधरी पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईत सापडला आहे. चोळेगाव-ठाकुर्ली येथील त्याच्या घरावर गुन्हे शाखेच्या कल्याण पथकाने आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा उघडकीस आला. छाप्यामध्ये घरातील चपलांच्या ठेवणीच्या स्टँडमध्ये गुप्त कप्पा तयार करून त्यात शस्त्रे लपवून ठेवण्यात आल्याचे समोर आले. या ठिकाणाहून सात पिस्तुले, तीनशेहून अधिक जिवंत काडतुसे, तसेच एअर गनच्या गोळ्या आणि तलवारी, चाकू, कोयते यांसारखी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. या शस्त्रांची किंमत सुमारे दहा लाख रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
Weapons seized f
 
सुरेंद्र पाटील हा समाजमाध्यमांवर गँगस्टर शैलीतील चित्रफितींमुळे ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल झाले असून, त्याला आधीही अटक करण्यात आली होती. पोलिस तपासात उघड झाले की, जप्त करण्यात आलेल्या काही शस्त्रांचा वापर तो आपल्या चित्रफितींमध्ये दर्शवण्यासाठी करत होता.दावडी परिसरातील त्याचे कार्यालय आणि निवासस्थान याठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही छापेमारी करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास सुरू केला असून, शस्त्रांचा स्रोत आणि वापर याबाबत सखोल चौकशी केली जात आहे.