'चंद्रावर पुन्हा मानव...' आर्टेमिस II म्हणजे काय?

काय असेल मार्ग, तिथे पोहोचायला किती लागले वेळ, आणि जाणून घ्या बरेच काही

    दिनांक :01-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
artemis-ii : मानवाला पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने नेण्यासाठी अमेरिकेची अवकाश संस्था नासा सज्ज झाली आहे. ‘आर्टेमिस II’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेद्वारे चार अंतराळवीरांना चंद्राभोवती फिरवून पुन्हा पृथ्वीवर आणले जाणार आहे.
 
 
artemis-ii
 
 
ही मोहीम मानवासह चंद्राभोवती जाणारी जवळपास पाच दशकांनंतरची पहिलीच मोहीम ठरणार आहे. यापूर्वी १९७२ मध्ये अपोलो 17 मून मिशन ही शेवटची मानवयुक्त चंद्र मोहीम होती. ‘आर्टेमिस II’ मोहिमेत चार अंतराळवीर सहभागी असतील. हे अंतराळवीर अत्याधुनिक ‘ओरायन’ अंतराळयानातून पृथ्वीवरून उड्डाण घेतील. हे यान पृथ्वीभोवती फेरी मारल्यानंतर चंद्राच्या दिशेने प्रवास करेल आणि चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून पुन्हा पृथ्वीवर परत येईल.
 
या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे भविष्यातील ‘आर्टेमिस III’ मोहिमेसाठी तयारी करणे होय. त्या मोहिमेद्वारे मानवाला पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची योजना आहे. ‘आर्टेमिस II’ मोहिमेचा संपूर्ण प्रवास सुमारे १० दिवसांचा असेल. या काळात अंतराळवीर सुमारे ३,७०,००० किलोमीटर अंतर पार करून चंद्राभोवती फिरतील. या मोहिमेत विविध तांत्रिक चाचण्या आणि प्रणालींची तपासणी करण्यात येणार आहे, जे भविष्यातील मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
 
ही मोहीम यशस्वी झाल्यास, मानवाच्या अवकाश संशोधनात एक नवा टप्पा गाठला जाईल आणि चंद्रावर पुन्हा मानव पाठवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले जाईल.