अनिल कांबळे,
नागपूर,
wife-murdered : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची हत्या करणाèया पतीला सत्र न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासाेबतच आराेपीला 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही ठाेठावण्यात आली आहे. मनाेहर काशिनाथ मनगटे ( 58 ), असे जन्मठेप झालेल्या आराेपीचे नाव आहे.
ही घटना 23 सप्टेंबर 2023 राेजी खापरखेडा पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील भानेगाव येथे घडली हाेती. महिला रंजना या पती मनाेहरसह भानेगाव येथे राहत हाेत्या. गेल्या वर्षभरापासून मनाेहर हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडण व मारहाण करीत हाेता. यापूवीर्ही अनेकदा त्यांनी याच कारणावरून घरात वाद घातले हाेते.आराेपी मनाेहर याने घरगुती वादातून पत्नीवर संशय घेऊन राहत्या घरी नायलाॅनच्या दाेरीने तिचा गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी महिलेचा मुलगा आनंद मनाेहर मनगटे याने खापरखेडा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करून आराेपीला अटक केली हाेती. न्यायालयासमाेर सरकारी पक्षाच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश अनिलकुमार शर्मा यांनी आराेपीला जन्मठेपेची शिक्षा देत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरकारर्ते अॅड. लिलाधर शेंद्रे यांनी बाजू मांडली.